Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 प्रकाशक : एस.एस.वाघमारे

Jansanvad

कोल्हापूर दि.१६ : समाजातील विविध प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडण्याचं महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येतील, त्यांना पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. 


यावेळी प्रेस क्लबच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन व अन्य मान्यवरांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्यासह सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे. कोरोना काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केले. कोरोना, पूर परिस्थितीसह राज्यात आजवर आलेल्या अनेक संकटकालीन परिस्थितीत पत्रकारांनी खूप चांगले काम करुन आदर्श निर्माण केला आहे. पत्रकारांसाठी आम्ही कोरोना काळात तपासणीचे विशेष शिबिरांचे आयोजन केले होते. पत्रकार चौकस बुध्दीने, जागृत राहून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. शासनाच्या उणिवा दाखवतानाच समाजातील सर्वसामान्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्या त्या ठिकाणची चांगली कामे, महत्वाकांक्षी प्रकल्प याचेही लेखन, चित्रण पत्रकारांनी करुन ते समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केली. 


पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठीचा टॅक्स कमी करण्याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल. तसेच कोल्हापुरात पत्रकार भवन उभारण्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने, आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील -यड्रावकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. 


राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर मध्ये आजवर आलेल्या पूर परिस्थिती तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या त्या वेळी मदतीला धावून येत सहकार्याची भूमिका बजावली आहे, त्यांच्या पुढाकारानेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांसाठीचा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे. 


प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर व कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री व मान्यवरांचे स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे व उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी केले. मुख्यमंत्री सचिवालयात काम करणारे व कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वी पत्रकारिता केलेले अमित हुक्केरीकर आणि प्रशांत साळोखे यांचा प्रेस क्लब मार्फत सन्मान करण्यात आला. याचबरोबर पत्रकार समीर देशपांडे यांचा सन्मान 12 वर्ष विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत अक्षरगप्पा उपक्रम राबविल्याबद्दल व पत्रकार बाबुराव रानगे यांचा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

आभार प्रेस क्लबचे खजानिस बाबुराव रानगे यांनी मानले. सूत्रसंचालन पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. 

पत्रकार पुरस्काराचे मानकरी :

▪️उत्कृष्ट पत्रकार - संतोष पाटील, दै. तरुण भारत, 

▪️उत्कृष्ट छायाचित्रकार- बी डी चेचर, सकाळ, 

▪️उत्कृष्ट पत्रकार (टीव्ही) - विजय केसरकर. एबीपी माझा, 

▪️उत्कृष्ट कॅमेरामन (टीव्ही) - निलेश शेवाळे, एबीपी माझा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या